मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना


 बेरोजगार युवकांसाठी चांगली योजना महाराष्ट्र सरकार चालवत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. ऑनलाइन एप्लीकेशन करू शकतो.


1)अर्जदार अनुसूचित जाती /जमाती, महिला ,अपंग ,माजी सैनिक असेल तर शहरी भागात 25 टक्के अनुदान व ग्रामीण भागात 35 टक्के अनुदान मिळते. अर्जदाराची स्वतःची गुंतवणूक 5 टक्के असावी. बँकेकडून मिळणारे लोन हे शहरी भागासाठी 70 टक्के व ग्रामीण भागासाठी 60 टक्के आहे.

2) अर्जदार उर्वरित वर्गातील असेल तर शहरी भागात 15 टक्के व ग्रामीण भागात 25 टक्के अनुदान मिळते. अर्जदाराने स्वतःची गुंतवणूक 10 टक्के करावी. त्याला बँकेकडून शहरी भागात 75 टक्के व ग्रामीण भागात 65 टक्के लोन मिळते.

तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त बेरोजगार तरुणांनी घेतला पाहिजे.

दहा लाखाच्या वरती लोन हवे असेल तर 7 वी पास आवश्यक व 25 लाखाच्या वरती असेल तर 10 वी पास असणे आवश्यक आहे.

ऑनलाइन एप्लीकेशन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1) फोटो

2) आधार कार्ड

3) जन्माचा दाखला / शाळा सोडलेला दाखला /डोमेसिअल दाखला.

4) मार्कलिस्ट

5) हमीपत्र

6) जातीचा दाखला

7) विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र

8) पॅन कार्ड

9) लोकसंख्येचा दाखला

हे एप्लीकेशन तुम्ही मोबाईल वरून पण करू शकता. यामध्ये काही समजले नसेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा उद्योग केंद्राला भेट देऊन सविस्तर माहिती घेऊ शकता.

Post a Comment

0 Comments