RBI मध्ये नोकरीची संधी


 भारतीय रिझर्व बँक म्हणजे RBI मध्ये मुंबई येथे काही पदांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली असून यासाठी इच्छुक पात्र उमेदवाराने रिझर्व बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.


अर्ज सादर करण्या अगोदर सदर उमेदवाराने आपली पात्रता तपासावी आणि पूर्ण जाहिरात वाचून त्यानुसार आपला अर्ज सादर करावा.

ही भरती फक्त सातवी पास वर असून कमी शिक्षण असलेल्या उमेदवारासाठी चांगली सुवर्णसंधी चालून आली आहे तरी इच्छुक उमेदवाराने 27 मार्चपासून आपले अर्ज ऑनलाईन सादर करावेत.


पदांचा तपशील

चालक (ड्रायव्हर) – 05 जागा


शैक्षणिक पात्रता - सातवी ते दहावी पास व वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक


निवड पद्धत (RBI Mumbai Bharti)

ऑनलाईन पद्धतीने आलेल्या अर्जाची पडताळणी करून प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल आणि त्यानुसार प्रात्यक्षिक तसेच लेखी परीक्षा आणि मुलाखत घेऊन सदर उमेदवारांची निवड करण्यात येईल.


अर्ज करण्याची पद्धत

इच्छुक व पात्र उमेदवाराने रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज ऑनलाईन सादर करावेत.

अर्ज सादर करण्याचा कालावधी

इच्छुक उमेदवाराने 27 मार्च 2023 ते 16 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज भरावे तसेच अर्जाचे शुल्क सुद्धा अर्जा सोबतच भरावे लागेल.


आवश्यक कागदपत्रे

सदर पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा असून यासाठी ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच वाहन चालवण्याचा परवाना, पत्त्याचा पुरावा, शैक्षणिक कागदपत्र, पासपोर्ट साईज फोटो स्कॅन करून अपलोड करावेत.


उमेदवारासाठी सूचना (Reserve Bank Of India Recruitment)

वर नमूद केलेल्या पदासाठी ऑनलाइन चाचणी द्वारे परीक्षा घेण्यात येणार असून त्याद्वारे उमेदवाराची निवड होईल.

फक्त ऑनलाईन पद्धतीने 27 मार्च 2023 पासून अर्ज सादर करावेत इतर पद्धतीने आलेल्या अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत.

परीक्षेसाठी किंवा मुलाखतीसाठी कोणताही भत्ता रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून दिला जाणार नाही.

वरील जाहिरातीशी संबंधित कोणतेही शुद्धिपत्रक प्रकाशित करण्यात झाले तर ते फक्त तुम्ही बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकता

Tags

Post a Comment

0 Comments