बीजेपी सरकार आल्यापासून सारखा सारखा एकच प्रश्न विचारला जात आहे काँग्रेसने देशासाठी काय केले ? त्यांच्या प्रश्नाचे उत्तर हे सर्वसामान्य जनतेपासून ते जगामध्ये सर्वांना माहित आहे ,हा देश उभा करण्यासाठी काँग्रेसने काय काय केले, ते सध्या आलेले सरकार मध्ये असणाऱ्या लोकांना माहित नाही कदाचित ?, सरकार ज्या गोष्टीचे खाजगीकरण करून पैसा उभा करत आहे, व ते देश चालवत आहे ,ते कोणी केले आहे.
रेल्वे ,विमानतळ, बंदर, ऑईल कंपन्या हे सर्व काँग्रेस सरकारने उभे केले आहे .त्याचा विसर बीजेपी ला पडला आहे. ज्या राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली, पण त्याच राहुल गांधीनी खासदारकी पेक्षा खूप काही गमावले आहे, या देशासाठी ते विसरता विसरता कामा नये.
या देशासाठी त्यांची आजी वडील यांचा खून झाला आहे ,असे कोणते नेते झाले आहे असे मला आठवत नाही. त्याच्या भारत जोडो यात्रेला भेटला प्रतिसाद व अदानी समूहावर केलेला आरोप त्याच्यामुळे राहुल गांधी लोकसभेत नको होती का असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे. आदानी समूहाच्या आरोपाला पंतप्रधानांनी उत्तर द्यायची हिंमत पण केली नाही.
एक उद्योगपती जगातील श्रीमंतांच्या यादीत 2014 ला 603 वर होता. असे काय झाले या आठ वर्षात अदानी समूह जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आला. त्यांनी असा कोणता व्यवसाय किंवा उद्योग सुरू केला हे केंद्र शासनाने संसदेत सांगायला हवे होते. सरकारी तिजोरीत येणारा पैसा हा सर्वसामान्य जनतेचा असतो त्याचा वापर कसा करायचा याची जरा तरी अक्कल या राज्यकर्त्यांना आहे का ?
देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या जवानांना पेन्शन साठी सुप्रीम कोर्टात जावं लागतं . त्याना सरकार पेन्शन देऊ शकत नाही .याचा अर्थ काय देशाच्या तिजोरीत काही नाही का ? ती तिजोरी फक्त आदानी समूहासाठी आहे का' ?याचा खुलासा करावा.
2014 पूर्वी गॅस ची किंमत 500 रुपये होती, ती आता 1100 रू झाली. पेट्रोल व डिझेल 67 व 54 रुपये लिटर होते, ते आता 110 व 89 रुपये लिटर झाले आहे हे अच्छे दिन पंतप्रधान घेऊन आलेत. कधी कधी वाटते आमचे ते बुरे दिनच चांगले होते.
देशाच्या अर्थमंत्र्यांना कांद्याचे दर वाढले आहेत ,असा प्रश्न केला असता, ते बोलतात मी कांदा खात नाही ,याचा अर्थ काय ?देशाचे पंतप्रधान चहा विकत होते. असे बोलतात पण त्याच्यासाठी काय लागते हे तरी माहित आहे का त्यांना? याचा विचार सर्वसामान्य जनतेला करायला हवा.
देशाच्या राजकारणात हार व जीत होत असते .पण हुकूमशाही सरकार चालणारे सरकार कधीही देशाचे चांगले करत नाही. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर धर्म व धर्मामध्ये येथे. हिंदू खतरे मे हे गेली 50 वर्षात कोठे दिसला नाही .आणि बीजेपी सरकार आल्यापासून हिंदू खतरे मे आहे का. या सर्व गोष्टींचा विचार सर्व सामान्य जनतेने केला पाहिजे कोणताही धर्म आपल्या घरातील चूल पेटवत नाही व आपल्या पोटात अन्न भरत नाही. आपण कष्ट केल्याशिवाय आपल्या घरातील चुल चालत नाही याचा विचार सर्वसामान्य जनतेने करायला हवा.