75 हजार नोकरीचे गाजर


 महाराष्ट्रात गेली सात महिन्यापासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार आले ,तेव्हापासून त्यांनी 75 हजार नोकर भरती करू असे जाहीर केले पण  सत्यात किती नोकर भरती झाली याची कल्पना करा.

मागील तीन महिन्यापासून आरोग्य विभाग ,वनरक्षक यांची वेळापत्रक जाहीर झाली तरी पण त्यांची ना जाहिरात निघली त्यांचे फॉर्म चालू झाले. कोणतीही प्रोसेस चालू झाली नाही. मंत्र्याला  कॉल केला असता किंवा त्यांना विचारले असता ते म्हणतात लवकरच आम्ही भरती करून घेऊ पण गेले तीन महिन्यापासून कोणती प्रोसेस करत आहात. तुम्हाला परीक्षा घेण्यासाठी कोणती कंपनी निवडता  आली नाही ,मग तुम्ही 15  ऑगस्टपर्यंत भरती कशी करून घेणार, हा सर्वसामान्य तरुणांना पडलेला प्रश्न आहे. तुम्ही महाराष्ट्रात आलेली गुंतवणूक गुजरातला गेली त्याच्यावर तुम्ही काही करू शकला नाही. प्रधानमंत्री बोले  तुमच्या राज्यासाठी नवीन प्रकल्प आणून देऊ ते कुठे आहेत .फक्त निवडणुका आल्या की तुम्हाला सामान्य जनता लागते. परंतु सर्वसामान्य माणसाने विचार करायला हवा कोणत्याही नेत्याचा मुलगा हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत नाही ती सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंब ,शेतकऱ्यांच्या घरातून आलेली मुले मुली असतात. त्याचा विचार कधी सरकार करणार आहे का ? महाराष्ट्रात बेरोजगारीचे प्रमाण किती आहे हे सरकार आकडेवारी जाहीर करेल का ?  हल्ली सामान्य माणसांना  वापर करा व फेकून द्या असे करून ठेवले आहे या  राज्यकर्त्यांनी. सरकार कोणतीही असले तरी सर्वसामान्यांचा विचार शेतकऱ्यांचा विचार करताना दिसत नाही. ते फक्त आपापल्या पक्षाचे आमदारांना खुश ठेवण्यातच ् मग्न आहेत असे दिसत आहे. सरकार कधीतरी सर्वसामान्य चा विचार करेल असे दिसून येत नाही ते त्यांचे सरकार कसे टिकेल याचा विचार करत आहे. हे सरकार सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यावर नोकर भरतीची जाहिरात काढेल का,? महापालिकेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक जाहीर झाले वर नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करेल ? याचा विचार करायला हवा.

Post a Comment

0 Comments