भारतीय रेल्वेत नोकरीची मोठी संधी; ‘या’ पदाच्या २३८ जागांसाठी भरती, सविस्तर माहिती जाणून घ्या
भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची मुदत याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Indian Railway Recruitment 2023
भारतीय रेल्वे विभागाने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. फोटो लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Indian Railway Recruitment 2023: भारतीय रेल्वे विभागातर्फे असिस्टंट लोको पायलट पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. भारतीय रेल्वे भरती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, असिस्टंट लोको पायलट पदासाठी एकूण २३८ रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीद्वारे निवडलेल्या उमेदवाराला रेल्वेच्या पे मॅट्रिक्समधील ‘लेव्हल २’ प्रमाणे मासिक वेतन देण्यात येणार आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची मुदत याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – असिस्टंट लोको पायलट
आणखी वाचा
adipurush om raut troll
“ओम राऊत ड्रग्ज घेतो”; ‘आदिपुरुष’च्या पोस्टरमधील ‘ती’ चूक पाहून संतापले नेटकरी, म्हणाले, “सीता मातेच्या…”
ranveer singh deepika padukone new
Video: “मी याची खात्री…” घटस्फोटांच्या चर्चांनंतर दीपिकाबद्दल पहिल्यांदाच बोलला रणवीर सिंग
samir choughle photo
२५ वर्षांपूर्वी ‘असे’ दिसायचे समीर चौघुले, शेअर केला फोटो, म्हणाले…
sanyogeeta raje chhatrapati instagram post
संयोगीताराजेंच्या इंस्टाग्राम पोस्टनंतर आता काळाराम मंदिरातील महंत म्हणतात, “छत्रपती घराण्याचा अनादर होत असल्यास…”
शैक्षणिक पात्रता –
हेही वाचा- Assistant Professor Jobs: सहाय्यक प्राध्यापक पदासाठी मोठी भरती, १४ एप्रिलपर्यंत करा अर्ज
असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी (i) फिटर (ii) इलेक्ट्रिशियन (iii) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (iv) मिलराइट/मेंटेनन्स मेकॅनिक (v) मेकॅनिक (रेडिओ आणि टीव्ही) (vi) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (vii) मेकॅनिक (मोटर वाहन) ( viii) वायरमन (ix) ट्रॅक्टर मेकॅनिक (x) आर्मेचर आणि कॉइल वाइंडर (xi) मेकॅनिक (डिझेल) (xii) हीट इंजिन या ट्रेडमध्ये अॅप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे.
किंवा – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल्स इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा पुर्ण केलेला असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय १ जुलै २०२३ रोजी ४३ वर्षांपेक्षा जास्त नसावं. OBC प्रवर्गातील ४५ आणि एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांचे वय ४७ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
पगार – असिस्टंट लोको पायलट पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला रेल्वेच्या पे मॅट्रिक्समधील ‘लेव्हल 2’ प्रमाणे मासिक वेतन देण्यात येणार आहे.
महत्वाच्या तारखा –
हेही वाचा- ७०,००० रुपये महिना पगाराची नोकरी पाहिजे त्वरित करा अर्ज, परीक्षा न देता मिळेल नोकरी
ऑनलाइन अर्ज करायला सुरुवात तारीख – ७ एप्रिल २०२३
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ मे २०२३
उमेदवारांची निवड – संगणक-आधारित चाचणी/लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. त्यानंतर अॅप्टिट्युड टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट घेतली जाईल. सर्व तपशील योग्य वेळी निवडलेल्या उमेदवारांना सूचित केले जातील. भारतीय रेल्वे भरती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.
.